गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयात ‘MAGN-IT 25’ तांत्रिक कौशल्यांचा उत्साहवर्धक आविष्कार

पुणे : गणेशखिंड येथील  मॉडर्न कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधे बीबीए-सीए विभागातर्फे ‘MAGN-IT 25’ या भव्य आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.   या दोन दिवसीय स्पर्धेत तांत्रिक आणि सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक श्री  रणजीत देशमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. संजय खरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळ पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह  प्रा.प्रकाश दीक्षित, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डाॅ शुभांगी जोशी ,आय क्यु ए सी समन्वयक प्रा  पराग शहा हे उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग प्रमुख प्रा. सुवर्णा म्हसेकर यांनी करत स्पर्धेचे उद्दिष्टे स्पष्ट केली. तसेच प्रा.अनुष्का मुथ्था यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला.


श्री रणजीत  देशमुख यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संकल्पना, कौशल्य विकासाच्या संधी आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे नियम यावर मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्याचे विद्यार्थ्यांना सुचवले आणि आपल्या उद्योगातील अनुभवांचे शेअरिंग करून त्यांना प्रेरित केले. 

विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव देण्यासाठी  ब्लॅक आऊट कोडिंग , बीजीएमआय (मोबाइल) ,
डिझाइन अरेना ,फन फ्यूजन आणि लॅडर्स ऑफ लॉजिक अशा अनेक स्पर्धा दोन दिवसात घेण्यात आल्या त्या मध्ये २३८ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून बाहेरील १० महाविद्यालयांमधून सुमारे ५० विद्यार्थी सहभागी होते. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता . विभागातील प्राध्यापकांचा या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मोठा हातभार होता. कार्यक्रमासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करताना प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात कौशल्य विकासावर भर देण्याचे महत्त्व पटवून दिले.व विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक केले.  आणि भविष्यात अशा उपक्रमांच्या संख्येत वाढ करण्याचे आश्वासन दिले. 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा रानपिसे आणि श्रुती मुथ्था यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्वेता राणे यांनी केले.  महाविद्यालयाच्या बीबीए-सीए विभागाने उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देणारे ठरले.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण