न्यू अहिरे गाव येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण काही तासातच खराब

वारजे : वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अंतर्गत  न्यू अहिरे गाव अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून रस्त्यावरील माती स्वच्छता न करता डांबर टाकण्यात आल्याने डांबरीकरण केलेले डांबर रस्त्यापासून काही तासातच वेगळे होत आहेत. नागरिकांच्या करारूपी पैशाच्या अधिकाऱ्यांकडून उधळपट्टी सुरू असल्याचे आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी निदर्शनास आणून दिले.

दिनांक 13 नोव्हेंबर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात आले. 
पण सदर केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे.  रस्त्यावरील खड्डे मुजवताना खड्डा अगोदर पूर्णपणे साफ करणे गरजेचे असताना सुद्धा फक्त वरचेवर डांबर टाकून त्यावर रोलर फिरवला त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे करणरूपी पैसे हे मातीत गेल्याची चर्चा या ठिकाणी होत आहे. 

खड्डे मुजवण्याच्या डांबरीकरणाच्या कामामध्ये घोटाळे होत आहेत का? याची चौकशी करण्यात यावी तसेच रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  पहाटेच्या शपथविधी विषयी 'लोक माझे सांगाती' मध्ये काय आहे वाचा