पुणे : योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 50 हजार विद्यार्थ्यांमधून भारतीय अंतराळ संस्था ( इस्त्रो ) मध्ये देशातून प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल अजय भुजबळ यांचा विशेष सन्मान आमदार महेश लांडगे यांचे वडील किसन लांडगे, माजी नगरसेविका साधना मळेकर, पुरंदर पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव, 56 देशात नऊवारी साडी नेसून बुलेटवर प्रवास करणारी भारत की बेटी रमीला लटपटे ह.भ.प. संजय बालवडकर, ह.भ.प. शेखर जांभुळकर, स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक तथा योगीराज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त रामदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वरी मुख पाठ असलेल्या हेरंब देशमुख यांना व 10 वी च्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच सभासदांना 1 कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा लेखाजोखा यावेळी मांडला. कृष्णानगर शाखेची कर्ज वसुली 99% आहे तसेच संस्थेला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राज्यातील आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे, हे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
याप्रसंगी उद्योजक भगवान पठारे, श्रीराम समर्थ पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, भूमाता संघटनेचे अनिल बालवडकर, युवा नेते संग्राम मुरकुटे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, माजी संचालक वसंत माळी, संचालक गणेश तापकीर, निवृत्ती गाडे, राजाराम सोनावणे, उत्तम कारखिले,विवेक सुतार,संजय काळभोर , योगेश काळे,सचिन सानप, माणिक म्हेत्रे, राजेंद्र जमदाडे, ज्ञानदेव ईटकर, अमोल म्हेत्रे, शाखा समिती सदस्य योगेश म्हेत्रे, रामदास जाधव, दत्तात्रय भापकर, पांडुरंग कदम, पांडुरंग सुतार, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे, तसेच संस्थेचे सर्व संचालक व स्टाफ उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी आभार मानले.