बाणेरकरांनी मनमुरादपणे लुटला फॅमिली वॉकेथॉनचा आनंद

बाणेर : एकत्र कुटुंब व्यवस्था हा भारतीय सांस्कृतिचा कणा आहे, त्यामुळे या वैभवशाली परंपरेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतीय जनता पक्ष कोथरुड उत्तर मंडलाच्या वतीने फॅमिली वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाणेरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अबाल-वृद्ध, महिला यांचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता.

भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आपली ही वैभव संपन्न परंपरा ही आपली दौलत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि व्यस्त दिनचर्येमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ घालवणे शक्य होत नाही. म्हणून, भारतीय जनता पक्ष उत्तर कोथरुड मंडलाच्या वतीने बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंब सहभागी होण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली.

या स्पर्धेत वैभव संपन्न एकत्र कुटुंब परंपरेचे आगळे-वेगळे रुप पाहायला मिळाले. या फॅमिली वॉकेथॉन मध्ये बाणेरमधील प्रत्येक कुटुंब सहभागी झाले होते. त्यामुळे या स्पर्धेला एखाद्या सोहळ्याचे स्वरूप आले होते. अबाल वृद्ध, माता-भगिनी सर्वांनीच वॉकेथॉन मध्ये सहभागी होऊन; कुटुंबाच्या एकीचा आनंद मनमुरादपणे लुटला. या कौटुंबिक कार्यक्रमात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून बाणेरकरांच्या उत्साहाचे कौतुक केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात सहकुटुंब एकत्रित येऊन विचारांची देवाण घेवाण अतिशय आवश्यक आहे. यामाध्यमातून आपली नवीन पीढिला एक दिशा मिळण्यास मदत होते. फॅमिली वॉकेथॉनच्या माध्यमातून आज बाणेरकर एकत्र आले आहेत, ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि आपले उत्तम आरोग्यासाठी वॉकेथॉन सारखे उपक्रम अतिशय महत्वाची भूमिका बजावतात, अशी भावना याप्रसंगी नामदार पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनीही वॉकेथॉनचे कौतुक केले. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, वॉकेथॉनची पाश्चिमात्य संकल्पना पुण्यात माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात राबवण्यात आली होती. त्यात विविध वयोगटातील एक लाख पुणेकर सहभागी झाले होते. ‘वॉकेथॉन’ ही संकल्पना आता पुण्यातही रुढ होते आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आणि सुखावणारी आहे.

यावेळी वॉकेथॉनचे संयोजक तथा भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे अध्यक्ष संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, रोहन कोकाटे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, प्रकाशतात्या बालवडकर, उमा गाडगीळ, शरद भोते, काळुराम गायकवाड, सचिन दळवी, विवेक मेथा, उत्तम जाधव, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, वैशाली कामजदार, निकिता माताडे, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, राजेंद्र पाडाळे यांच्यासह बाणेरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  डॉ.नितीन करीर यांनी राज्याचा मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला