पुणे : मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड पुणे आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता आणि रोजगार व उद्योजकता या विषयावर दोन दिवसीय उपक्रमात 132 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे, डॉ.विलास आढाव, संचालक व विभाग प्रमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी समाजाची गरज ओळखून आंतरविद्याशाखीय शैक्षणिक ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगून स्वतःकडील कौशल्य ओळखून व्यवसायाची निवड करावी. केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार व उद्योगासाठी भरीव वित्तीय तरतूद केली आहे. विकसित शहरात रोजगार वाढत असले तरी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील दारिद्र्य ही समस्या वाढत आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय खरात यांनी नैमित्तिक शिक्षणाबरोबरच आयुष्याला समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडता येत असल्याचे सांगितले.
वित्तीय साक्षरता या उपक्रमांतर्गत विषय तज्ञ श्री प्रणव देसाई यांनी सीएफए प्रोग्रॅमची माहिती दिली तसेच डॉ.ज्ञानेश्वर फड यांनी शेअर मार्केट मधील दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले.
रोजगार व उद्योजकता या उपक्रमात विषय तज्ञ श्री अमित गोडसे यांनी मधमाशांचे संवर्धन याबाबतची माहिती दिली तर श्री आनंद देशपांडे यांनी रोजगार व व्यवसायसाठी आपल्या आवडीनिवडीनुसार निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय खरात, कला शाखा उपप्राचार्य डॉ.ज्योती गगनग्रास, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. शुभांगी जोशी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. नामदेव डोके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बासोगसो क्री, ऋतुजा राऊत यांनी केले व आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. आबासो शिंदे यांनी व्यक्त केले.
























