महाळुंगे : महाळुंगे येथील इक्वीलाईफ होम्स सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात सोसायटीमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा गीताच्या सुमधुर गायनाने केली. विशेष आकर्षण ठरले राज्याभिषेक सोहळ्यावर सादर केलेले नयनरम्य नृत्य, ज्यामध्ये 40 हून अधिक मुलांनी भाग घेतला. लहान बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत साजरे करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे नियोजन अनिरुद्धजी काळे, अभिजीत साळी, अभिजीत चौगुले, आकाश बिराजदार आणि शुभम बाभरे यांनी केले.या भव्य आणि उत्साही सोहळ्यामुळे संपूर्ण सोसायटीत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
घर ताज्या बातम्या महाळुंगे येथील इक्वीलाईफ होम्स सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी