बालेवाडी : चॅम्पियन्स ट्रॉफी मधील 23 तारखेला होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे भव्य 600 स्क्वेअर फुट एलईडी स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण बालेवाडी येथे हाय स्ट्रीट येथील मैदानावर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी करण्यात आले आहे.
बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सुस महाळुंगे आदी परिसरातील क्रिकेट चाहत्यांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच एकत्रितपणे भव्य स्क्रीनवर पाहता येणार आहे. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिकांना यावेळी मॅच पाहण्याचा आनंद घेता येणार असून या ठिकाणी नागरिकांना बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी बालेवाडी येथील हायस्ट्रिट ग्राउंड येथे भव्य स्क्रीन द्वारे सामना पाहण्यासाठी क्रिकेटच्या त्यांनी यावे असे आवाहन अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
घर ताज्या बातम्या बालेवाडी हायस्ट्रीट ग्राउंडवर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे 600 स्क्वेअर फुट एलईडी स्क्रीनवर...