पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष समिती स्थापन करणार असून माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
ही माहिती राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंदकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.बिडकर यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष,सभागृह नेता अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
संघटनेतील आघाड्या,भारतीय जनता युवा मोर्चा तसेच शहर कार्यकारिणी नेमणुका लवकर केल्या जाव्यात अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना दिल्या.महापालिका निवडणुकीसाठी भाजप आखणी करीत असून याकरिता पाटील यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी घेतली.महायुती करण्याबाबत पाटील यांनी बैठकीत भूमिका जाहीर केली नाही.