बाणेर : महिला दिनाचे औचित्य साधून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साईदत्त हॉल, बाणेर येथे भव्य महिला दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन हिरकणी महिला बचत गटाने भाजप प्रभाग सरचिटणीस तसेच हिरकणी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. हर्षदा थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
या सोहळ्यात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, बाणेर येथील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित महिलांना समानता आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले. येथेच न थांबता, त्यांनी ओवाळणीसाठी थांबलेल्या भगिनींच्या हातातून ताट घेत स्वतः सौ. हर्षदा थिटे यांना औक्षण करून दाखवून दिले की महिलांना प्रत्येक ठिकाणी सन्मान व समान वागणूक मिळणे हीच खरी महिला दिनाची भेट आहे.
यापुढे महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात माजी नगरसेविका सौ. ज्योती कळमकर, सौ. स्वप्नाली सायकर, तसेच भाजप पदाधिकारी सचिन पाषाणकर, प्रकाशतात्या बालवडकर, सौ. अस्मिता करंदीकर, सौ. कल्याणी टोकेकर, सौ. मीनाताई पारगावकर, सौ. सुजाता धनकुडे, सौ. निकिता माताडे, सौ. पायल मुरकुटे, सौ. प्राजक्ता देवस्थळी, सौ. सुरेखा वाबळे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिरकणी महिला बचत गटाच्या सौ. चैताली जपे, सौ. पूनम खैरनार, डॉ. सौ. प्रियांका देशमुख, डॉ. सौ. स्नेहल तांभारे, सौ. अंजली बिनॉय, सौ. भारती शर्मा, सौ. सोनल पाटील, सौ. प्रतिभा पाटील, सौ. मीनल बनाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
घर ताज्या बातम्या हिरकणी बचत गटाच्या वतीने बाणेर परिसरात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन