IPL 2023 RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात बदल केले आहेत. विल जॅक दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या अगोदर स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल त्याच्या जागी आला होता. ब्रेसवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केली होती.























