बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पावसाळी व ड्रेनेज लाईनच्या साफसफाईची पूनम विधाते यांची पालिका प्रशासनाकडे मागणी

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर महिला कार्यध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांनी बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईनच्या साफसफाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले.

मागील काही दिवसांपासून बाणेर-बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. येत्या काळात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन व नाले त्वरित साफ करणे आवश्यक आहे.

अनेक ठिकाणी कचरा साचल्यामुळे आणि लाईन तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी तातडीने या भागातील पावसाळी व ड्रेनेज लाईन साफ करण्याची मागणी पुनम विधाते यांनी केली आहे. त्यांनी महानगरपालिकेला त्वरित यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

See also  पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार