पाषाण: पुणे शहरामध्ये मोफत खेळता येतील अशी क्रीडांगणाची संख्या कमी आहे. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून मुलांना खेळण्यासाठी मैदानांचे आवश्यकता आहे परंतु राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल (आयटीआय) मैदान, साई चौक,सुस रोड,पाषाण खेळाचे मैदान आहे की डम्पिंग ग्राउंड असा प्रश्न पडलाय, कारण इतर लोक तर कचरा व राडाराडा टाकतातच पण पुणे महानगरपालिका देखील डम्पिंग ग्राउंड असल्याप्रमाणे येथे सर्व प्रकारचा राडाराडा टाकते, छाटलेली झाडे,राडारोडा,रस्त्यावरील कचरा सर्व इथेच टाकला जात आहे.
सुतारवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरातील युवकांना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हे एकमेव मैदान उपलब्ध आहे.
अलीकडेच परिसरातील युवकांनी एकत्र येत स्वखर्चाने सबंध मैदान साफ करून लेवल केले होते परंतु पुणे मनपाने पुन्हा याला डम्पिंग ग्राउंड बनवत कचरा व राडारोडा टाकलाय.वारंवार तक्रार करून देखील पुणे मनपा याबाबत गंभीर दिसत नाही.
अत्यंत गंभीर असून तातडीने ग्राउंड साफ करून राडारोडा व कचरा टाकणं थांबवावे अन्यथा हाच राडारोडा जवळील आरोग्य कोठी किंवा मनपा कार्यालयात नेऊन टाकण्यात येईल असा इशारा समीर उत्तरकर यांनी दिला आहे.