औंध : सुतारवाडी पाषाण परिसरातील महेश भिमराव सुतार व सौ पूजा महेश सुतार या तरुण जोडप्याने पुढाकार घेत प्रभाग 9 सुस बाणेर पाषाण प्रभागातून राखीव महिला व सर्वसाधारण पुरुष गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
महेश भिमराव सुतार यांनी वडील भिमराव फकिरा सुतार यांच्याकडून आदर्श घेऊन लहानपनापासून सामाजिक कार्याची आवड जोपासली.संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेतलेले महेश सुतार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून समाजाचे प्रश्न मार्गी लावत असतात. सर्वसाधारण पुरुष गटातून पक्षाकडे उमेदवार म्हणून इच्छुक होते. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून अर्ज केला.तसेच महेश सुतार यांच्या मातोश्री सुनिता भिमराव सुतार चौधरी या मुख्याध्यपिका म्हणून निवृत्त झाल्या असून सुस सुतारवाडी पाषाण सोमेश्वर वाडी परिसरातील महानगर पालिका शाळेत शिक्षिका काम केले आहे.त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत फकिरा फाउंडेशन माध्यमातून महेश आणि पुजा ना नफा ना तोटा या तत्वावर प्रिस्कूल चालवतात.समाज सेवेचा हाच वसा पुढे नेण्यासाठी आज प्रभाग 9 मध्ये दोघांनी इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज भरला.
























