आनंदवन नव चैतन्य हास्य क्लब बाणेर यांच्या कडून  शिवजयंती उत्साहात साजरी

बालेवाडी : बाणेर येथील आनंदवन नव चैतन्य हास्य क्लब मुरकुटे उद्यान, यांच्या वतीने शिवजयंती उत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी सात वाजताच रघु नाना कळमकर चौक ते मुरकुटे उद्यान अशी मिरवणूक काढण्यात आली. मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषा करून  जेष्ठ नागरिकांनी व अनेक मान्यवरानी या उत्सवामध्ये सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने सर्व परिसर दुमदुमून गेला .


बाणेर येथील मुरकुटे उद्यानामध्ये आनंदवन  हास्य क्लब भरतो. यांच्या वतीने (ता.१७) मार्च रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ,उपस्थित महिलांनी  पाळणा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नंतर रघुनाना कळमकर चौक ते मुरकुटे उद्यान अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला आयुष पाटील, घोड्यावरती स्वार होऊन मिरवणुकी मध्ये  सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच बरोबर बालेवाडी येथील लहान मुलांनी लाठीकाठी,  तलवार बाजी,  दांडपट्टा चे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांची मने जिंकली .भगवे झेंडे ,भगवे फेटे,  मराठमोळी वेशभूषा करून ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले.  या वेळी या भागातील माजी प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल बालवडकर , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते . हास्य क्लब चे अध्यक्ष, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त  श्री अजय कदम व क्लब मधील त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजक करत, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

See also  यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’चा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न