कासार आंबोली शीवेवरील रस्त्यावरील अनाधिकृत खाणीचे खोदकामावर कारवाई करण्याची मागणी

पिरंगुट : कासार आंबोली येथील गट नंबर 883 मध्ये अनाधिकृत खोदकाम व खाणकाम सुरू असून कासार आंबोली व अंबडवेट गावाच्या हद्दीवरील शीवरस्ता देखील खोदण्यात आला आहे.

कासार आंबोली मधील खाणींमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत आहे. याचा त्रास या परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. निसर्गाचे मोठ्या प्रमाणात यामुळे हानी झाली आहे.

कासार आंबोली व अंबड वेट गावांच्या हद्दीवरील शिवरस्ता देखील खोदण्यात आला असून या शिवे वरील रस्त्यावर खाण चालकाने विजेचा ट्रान्सफॉर्मर उभारला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना हा रस्ता वापरता येत नाही. अडथळे निर्माण झाल्यामुळे रस्त्याचा वापर करता येत नाही. सदर ठिकाणी  उत्खनन करण्यास बंदी असताना देखील राजरोजपणे क्रशरचा व्यवसाय सुरू आहे.

कासार आंबोली परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बेकायदेशीर खोदकामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच शिवे वरील रस्त्यावरील विजेचा ट्रान्सफॉर्मर हटवण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहेत.

See also  पुरस्काराच्या क्षेत्रात विस्तार आणि रकमेतही मोठी वाढ करीत असल्याचे समाधान – मंत्री सुधीर मुनगंटीवार