गजानन कॉलनी काळेपडळ येथे ड्रेनेज लाईनचे सांडपाणी रस्त्यावर

हडपसर : गजानन कॉलनी काळेपडळ म्हसोबा मंदिर शेजारी ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असेल नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शालेय मुले, तसेच महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण आजारी पडत आहेत.

रस्त्यावर वाहणारे सांडपाणी यामुळे नागरिकांना नाक मुठीत घेऊन दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी अशी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी केली आहे.

See also  सत्तेसाठी "भाजपबरोबर जाऊन बसायचं" ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. -शरद पवार