आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांना राष्ट्रसंत पदवी प्रदान

पुणे : पूज्य आचार्य श्री विजय नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांना श्री गोडवाड जैन श्वेतांबर मूर्तीक पूजक संघाच्यावतीने ‘राष्ट्रसंत पदवी’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेले आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांचे ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. जयराज भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंजाब केसरी पू. आ. श्री विजय वल्लभसुरीश्वर यांचे पट्टधर व नुकतेच भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व महाराष्ट्र सरकारचे विशेष राजकीय अतिथी शांतीदूत पू. गच्छाधीपती आ. श्री विजय नित्यानंदसूरीश्वर म. सा. यांना अध्यक्ष फतेचंदजी रांका, सचिव गणपतराज मेहता व सर्व ट्रस्ट मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत ही पदवी आणि सन्मानपत्र देवून सन्मानित केले. गुरुपूजनाचे लाभार्थी फतेचंदजी रांका परिवाराला गुरुदेव श्री यांच्यावर चादर अर्पण करण्याचा मान मिळाला.


विमलचंद संघवी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. फतेचंदजी रांका यांनी सांगितले, की आपल्या गुरूंच्या उपकारांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो. गुरूंच्या गुणांचे वर्णन करताना मुनिराज श्री मोक्षानंदविजयजी म. सा. म्हणाले, की गुरूंच्या आशीर्वादानेच संसारातील कठीण कामही सहज पूर्ण करता येतात. पू. आ. श्री नित्यानंदसूरीश्वरजी म. सा. यांनी काेणत्याही पदव्यापेक्षा लोकांचे प्रेम हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. समाजाच्या कल्याणासाठीच्या कामांमध्ये गोडवाड जैन श्वेताम्बर संघाचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे.


या प्रसंगी विमलचंद संघवी यांनी ‘गोडवाड ९९’ हा ग्रंथ आचार्य श्री यांना समर्पित केला. या कार्यक्रमाचे संचालन विश्वस्त संपत जैन यांनी केले. आभार व्यक्त करताना संपत जैन यांनी गुरुदेव श्रींची विनम्रता व मधुर अमृतवाणीचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमात विश्वस्त प्रकाश छाजेड, संपत जैन, भद्रेश बाफना, सुरेश कुंकुलोल, अशोक लोढा, ललित लालवाणी, रोहित बाफना, किरण बलदोटा, पारस बोराणा, विजय नहार व समाजाचे मान्यवर उपस्थित हाेते, अशी माहिती संपत जैन यांनी दिली.

See also  नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे