एसआरएच्या खाजगी विकासाच्या फायद्यासाठी बालभारती रस्ता बनवण्याचा प्रयत्न – कोथरूड मधील नागरिकांचा आरोप

कोथरूड : कोथरूड मधील वसंत नगर, इंदिरा पार्क, जयराम सहकारी गृहरचना संस्था मधील नागरिकांनी बालभारती ते पौड रस्ता प्रस्ताविक रस्त्यास जाहिर विरोधास जाहिर पाठिंबा देत नागरिकांना बेघर करू नका अशी मागणी आंदोलनादरम्यान केली.

सर्वे नं. ४४ मधुन जाणा-या बालभारती ते पौड रोड हा रस्ता आमच्या वसंतनगर व इंदिरा पार्क गृहरचना
संस्था मर्यादित यातील वास्तव्यास असणा-या रहिवासीयांना व सभासदांना कुठल्याही प्रकारची कल्पना
किंवा विश्वासात न घेता अचानक या रस्त्याची दिशा व रूंदी ही मनमानी प्रमाणे एका रात्रीमध्ये
बदलण्यात आली असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. येथील नागरिकांच्या गृह रचना संस्थेच्या अधिपत्याखाली असणा-या वसंतनगर या भागाच्या ३एकर भुखंडापैकी सुमारे ७० ते ८० हजार स्क्के फुट जागा बाधित होत आहे. तिथे सुमारे ५०० ते ५५०
कुटुंब आज रोजी अस्तित्वात असून त्यापैकी ३५० ते ३७० घरे या रस्त्यामध्ये बाधित होत आहेत.
हा रस्ता कोणाच्या मर्जीने एका रात्रीमध्ये बदलण्यात आला हे कारण अजूनतरी गुलदस्त्यामध्ये आहे.
१९८७ च्या प्रारूप आराखडयात या रस्त्याची रूंदी ८० फुट ऐवढी होती. पण आज रोजी हा रस्ता ६०
मीटर म्हणजे सुमारे १६० ते १८० फुट एवढी रूंदी एका रात्रीत वाढवण्याचा हेतु संशयास्पद आहे.
इथे होणा-या एसआरएच्या प्रकल्पातील विकसक सीन्यू डेव्हलपर्स या व्यवसायीकास लाभ होण्याच्या दृष्टीने हा रस्ता बनवण्यात येत असल्याचे त्या नागरिकांचे म्हणणे आहे.
गेली २७ वर्षे हा प्रकल्प वेळोवेळी कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून
दबाव तंत्र वापरून व्यावसायिक व शासकीय अधिकारी यांच्या हितसंबंधातून आमच्या संस्थेच्या सभासदांना व रहिवासी यांना अंधारात ठेवून रेटून नेण्याचे काम व्यावसायिक व एसआरएतील
अधिकारी संगनमताने होत आहे व यात मोठ्या प्रमाणावर तफावत असून नविन रस्त्यास आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा रस्ता रद्द करावा अशी मागणी या पत्रकाद्वारे नागरिकांनी केली आहे. यातील
वसंतनगर ची ३ एकर जागा ही जयराम हकारी गृहरचना संस्था मर्यादित च्या अधिपत्याखाली येत असून आमच्या संस्थेचा या रस्त्यास विरोध आहे असे यावेळी राहुल वांजळे यांनी सांगितले.

See also  अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.