अनाधिकृत ओवरहेड केबल पुढे पुणे मनपा आयुक्तांसह अधिकारी हातबल का? चिरीमिरीच्या धोरणामुळे बुडतोय कोट्यावधींचा महसूल

पुणे : पुणे महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवणारी यंत्रणा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कार्यरत असताना देखील पालिका अनधिकृत ओवरहेड केबल वर कारवाई करत नाही. पुणे मनपाच्या आयुक्तांसह पालिका अधिकारी इतके हतबल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाणेर, औंध, पाषाण, कोथरूड, कात्रज अशा मोठ्या उपनगरांमध्ये अनाधिकृत केबलचे जाळे पसरले आहे.  विद्युत खांबावरील अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाला देण्यात आलेले नाही. ओव्हरहेड अनधिकृत इंटरनेट केबल टाकणाऱ्यांवर कारवाई साठी सक्षम यंत्रणा पुणे महानगरपालिकेकडे नाही यामुळे अनधिकृत केवळ मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात आहेत.

अनाधिकृत केबलवर कारवाई केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पुन्हा केबल जैसे थे पाहायला मिळतात. इंटरनेट कंपन्यांवर तसेच केबल टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने अनधिकृत ओवरहेड केबलचे जाळे मुख्य चौकांमध्ये देखील पाहायला मिळते. कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवणारा कारभार पुणे महानगरपालिकेच्या डोळ्या देखत होत असताना देखील सक्षम कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देखील चिरीमिरी दिली जाते त्यामुळे कारवाई होत नाही असे दबक्या आवाजात बोलले जाते. पालिकेच्या विद्युत खांबावरील तसेच ओवर हेड केबल बाबत पुणे महानगरपालिकेने कारवाईसाठी स्वतंत्र विभाग करावा तसेच बुडणारा पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल कारवाई करून वसूल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

See also  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतूक जणजागृती - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) क्रीडा सेलचा लक्ष्मी रस्त्यावर उपक्रम