मुंबई येथे खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकणारे चार आरोपींना जेरबंद

पुणे : मुंबई येथे खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकणारे चार आरोपींना जेरबंद करुन पौड पोलीस स्टेशनकडील खूनाचा गुन्हा खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला.


खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पथक
सराईत गुन्हेगारांना चेक करीत असताना पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव यांना गोपनीय बातगीरामार्फत माहिती
प्राप्त झाली कि, पुण्यातून कलिना मुंबई येथे जावून काही इसमांनी मुंबईस्थीत झो परेरा नामक इसमास जिवे ठार मारुन
मुळशी परिसरात टाकून दिले आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर यांनी घटनेची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन सदरची माहिती श्री अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांना दिली असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखे कडील दोन पथक तयार करुन आरोपीचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथक २ यांनी पलंगे हॉटेल, खेड शिवापूर येथून गुन्हयात वापरलेल्या गाडी क्रमांकाचे आधारे १) अशोक महादेव थोरात वय ३५ वर्षे, रा. टोळे फार्म, एन.डी.ए. रोड, वारजे पुणे, मुळ रा. मु.पो. पारुडी ता. आष्टी, जि. बीड, २) गणेश साहेबराव रहाटे वय ३५ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, लेन नं. १,
अप्पर, पुणे, मुळ रा. मु.पो. सावळी बु. ता. अकोले जि. अमरावती, ३) धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके वय ४० वर्षे,
रा. घर नं. ४३०, हरकानगर, भवानी पेठ पुणे, ४) योगेश दत्तु माने वय ४२ वर्षे, रा. आदित्य गार्डन सिटी मागे, म्हाडा कॉलनी, फलॅट नं.६१२, वारजे माळवाडी, पुणे यांना त्यांचे ताब्यातील गाडीसह ताब्यात घेवून खंडणी विरोधी पथक२. गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी दि.२०/१२/२०२३ रोजी कलिना, मुंबई येथे जावून आरोपी क्र.४ योगेश गाने याच्या गेव्हणी सोबत लीव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणारा इसम नागे झो परेरा याचे आरोपीचे मेहुणी सोबत असलेल्या वादाचे कारणावरून मयत झो मॅन्युअल परेरा याचे घरामध्ये जावून त्याला बोथट हत्याराने मारहाण करून गळा आवळून जीवे ठार मारून त्याला स्वतःकडील टाटा गाडी गाडीमधून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मुळशी परीसरात रोडलगत असलेल्या झुडपामध्ये टाकून दिले असल्याचे सांगितले.
सदर घटनेबाबत पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे संपर्क साधुन खात्री केली असता त्याबाबत पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण हददीमध्ये दि. २१/१२/२०२३ रोजी गोणवडी गावचे जवळ, पुणे – कोलाड रोडलगत अनोळखी इसमास खून करून त्याची बॉडी फेकलेली असून त्याबाबत पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ६३२ / २०२३ भादविक ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. सदरबाबत पडताळणी केली असता सदर अनोळखी डेड बॉडी हि झो मॅन्युअल परेरा याची असल्याची व सदरचा गुन्हा हा नमूद आरोपीतांनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

See also  लहान मुले, युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


त्यांना सदर गुन्हयाचे पुढील कारवाईकामी गुन्ह्यात वापरलेली गाडीसह पौड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
आरोपी क्र.३ धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी खून,
अपहरण, खंडणी, गारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई येथे खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मुळशी परिसरात फेकलेला असताना खंडणी
विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी तात्काळ कारवाई करुन चार आरोपीतांना जेरबंद करुन पौड पोलीस
स्टेशन कडील गुन्हा रजि. नं.६३२ / २०२३ भादविक ३०२,२०१,३४ हा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली
आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही गा.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)
(पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे,
सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पोलीस
निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे,
ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, शंकर संपते, सैदोबा
भोजराव, चेतन आपटे, पवन भोसले, अगोल पिलाणे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.