दादांनो, सामान्य पुणेकरांना वाचवा! कुठे आहेत नव्या पुण्याचे शिल्पकार? आम आदमी पार्टीचा टीकात्मक सवाल

पुणे  : पुण्यात भर दुपारी बाजीराव रस्त्यावरती एका युवकाचा खून झाला. मोठ्या प्रमाणावर रहदारी असताना हा हल्ला झाला व त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.

काही दिवसापूर्वी कोंढवा भागामध्ये अशाच पद्धतीने खून झाला. या पुण्यामध्ये हे सर्व काय चालू आहे असा सवाल आता सर्वच जण विचारीत आहेत. पुण्याचे आपणच शिल्पकार असल्याच्या घोषणा करणारे आणि स्वतःला चाणक्य समजणारे नेते कुठे आहेत? शांत शहर, सुसंस्कृत शहर असे प्रसिद्ध असलेले,शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता गँग आणि वेगवेगळ्या टोळ्या त्याचबरोबर भुरटे चोर आणि गुन्हेगार यांचे माहेरघर बनत चालले आहे का?

याविषयी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ या दादा लोकांच्या दहशती पुढे पुण्यातील पोलीस पूर्ण हतबल झाले आहेत का? स्वतःला दादा म्हणवून घेणारे आमचे आजी, माजी पालकमंत्री कुठे आहेत? दादांनो सामान्य पुणेकरांना वाचवा, तुमची दादागिरी जनतेच्या संरक्षणासाठी वापरा. पुणेकर उद्विग्न झालेला आहे. या गुन्हेगारीचा शहर बनण्याला महायुती सरकार चे ट्रिपल इंजिन जबाबदार आहे.’ असे आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केले आहेत.

See also  पालकमंत्र्यांची शहरातील मुळा-मुठा नदी पुनर्जीवन व मैला पाणी शुद्धीकरण केंद्र विकासकामांना भेट