औंध डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, डीपी रोड,बोपोडी परिसरात अतिक्रमण कारवाई

औंध  : औंध येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर अतिक्रमण कारवाई औंध बाबासाहेब आंबेडकर चौक, डीपी रोड,बोपोडी गावठाण,बोपोडी आंबेडकर चौक येथे करण्यात आली.

यावेळी २५ हाथगाडी,२८ फळ आणि भाजी पथारी,३ काऊंटर,१ स्टॉल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.


परिमंडळ क्रमांक २ उपायुक्त श्री अविनाश सकपाळ तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक  महेश मारणे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, हणमंत काटकर, अभिलेश कांबळे आणि महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान तसेच बिगारी सेवक यांच्या पथकाने कारवाई केली.

See also  चूक अभाविप ची नाही तर त्यांच्या मार्गदर्शकांची.- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस : पुणे विद्यापीठात धुडगूस घालत तोडफोड करण्याची कृती, २० जणांवर गुन्हा दाखल :