शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसांच्या व पत्रकार दिनाच्या निमित्ताने करण्यात आला

पुणे : पत्रकारांची भूमिका समाजाला दिशा देणारी असते त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात माणसाला सन्मानपूर्वक जगण्यासाठी पत्रकार आणि त्यांची लेखणी यांची भूमिका कायमच अग्रभागी राहिली आहे,  असे मत शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  रवींद्र मिर्लेकर साहेब याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज बालेवाडी बाणेर परिसरात युवा सेनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ शिवसैनिक  बाणेर पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे पाटील, शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे यांच्या शुभहस्ते पत्रकारांना आज आकर्षक जॅकेटचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेले पत्रकार केदार कदम (पुणे बुलेटिन न्यूज), दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब तारे, दैनिक पुण्यनगरीचे पप्पू कंधारे, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी मोहसीन शेख, दैनिक प्रभातचे अभिराज भडकवाड, दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश अभिमाने, गुणवंत जाधवर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राम गायकवाड, कोथरूडचे शिवसेना विभाग प्रमुख महेश सुतार, शाखा प्रमुख निलेश गुजर, दत्ता खैरे, गौरव पाडाळे, संकेत गोपाळ, यश पाडाळे, संकेत लोंढे, महेश भांडे, अनिकेत बनसोडे, अविनाश अंबुरे, संकेत डेंगळे, आदेश बदरगे, करण भांडे, ऋतिक भांडे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे उपशहर प्रमुख युवा सरपंच मयूर भांडे यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना व रचना नंदकिशोर लोंढे यांनी मांडली होती. कार्यक्रमाचे आभार कार्पोरेट क्षेत्राचे सल्लागार गुलाब तांदळे यांनी केले.

See also  आम आदमी पार्टी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या मैदानात