औंध : औंध डि.पी.रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलीस उपायुक्त विठ्ठल डबडे खडकी विभाग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित व त्यांच्या जीवनावरील पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, शिवम बालवडकर, मनोज बालवडकर, पै.निलेश ठोसर, सौरभ कुंडलिक, अजय निरवणे दिनेश ठोसर, इरफान पठाण, रविंद्र भालेराव, किरण मोरे, इत्यादी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रमेश ठोसर रिपब्लिकन पक्ष पुणे शहर नेते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, बहुजन उद्धारक सामाजिक संस्था यांनी केले होते.
























