मनसेचे शहर उपाध्यक्ष चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांचा कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

पुणे : पुणे शहर मनसेचे उपाध्यक्ष,युवा उद्योजक तथा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

यावेळी हेमंत बत्ते, हिंदू युवा प्रबोधनीचे अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे, नितीन पायगुडे, प्रतीक सदाशिवराव मोहितेपाटील, रणजित ढगे पाटील, अभीषेक जगताप, विशाल पवार यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

मनसेच्या पक्षस्थापने पासून सलग ८ वर्षे आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने संपूर्ण पुणे शहरात भरभक्कम संघटना वाढविण्यासाठी काम केलेल्या आणि संदीप मोहिते पाटील आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेतील जाहीर पक्षप्रवेशाने पुणे शहरांमध्ये शिवसेना बांधणीला नवीन ताकद मिळाली असल्याचे वर्तवले जात आहे.

येत्या काळात सर्वप्रथम असणाऱ्या बहुप्रतिक्षीत असणाऱ्या मनपा निवडणुकीच्या दृष्टीने मोहितेपाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश हा संघटनेला महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. भाजपा व राष्ट्रवादी चा वर चष्मा असलेल्या पुणे शहरामध्ये शिंदे गट देखील आपली ताकद वाढवताना दिसत आहे.

See also  शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरण उपोषण