कात्रज – ज्येष्ठ नागरिकांना गेली अनेक वर्षे आरोग्यसेवा देणारे स्वर्गीय राजेंद्र राम बिलास मुंदडा चारिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर व महा एन्जो फेडरेशन यांच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवा डॉक्टर आणि औषधांसह सुसज्ज रुग्णवाहिकेने वारकऱ्याना आरोग्य सेवा दिली.
स्व. राजेंद्र रामबिलास मुंदडा चारिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या माध्यमातून कात्रज येथे अनेक वर्षापासून दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा पुरवली जात होती . केवळ पुणे शहरापुरती ही आरोग्य सेवा मर्यादित न ठेवता यावर्षी आळंदी ते पंढरपूर अशी मोफत आरोग्यसेवा रुग्णवाहिका देण्यात आली. या आरोग्यसेवेचा लाभ हजारो वारकऱ्यांनी घेतला. वयोवृध्द, महिला ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असल्यामुळे आरोग्याची काळजी अनेक सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, संघटना, शासकीय यंत्रणा घेतात. मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होवू लागल्यामुळे अनेकदा या सेवा अपुर्या पडतात. या आरोग्यसेवेला आपलाही हातभार लागावा या उद्देशाने माय माऊली केअर सेंटरने वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूर अशी संपुर्ण आरोग्यसेवा रुग्णवाहिका सेवा दिली.
महा एनजी ओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, ह.भ.प.अक्षय महाराज भोसले व विठ्ठलराव वरुडे पाटील विकास मुंदडा यांनी सहभागी सर्व फेडरेशनचे पदाधिकारी सभासद डॉक्टर्स व आरोग्य सेवकांचे आभार मानले.