पौड: मुळशीतील ९२ ग्रामपंचायतींचे पुढील ५ वर्षांसाठी (सन 2025 ते 2030 या सालासाठी)सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाल्या.
मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. तहसीलदार रणजीत भोसले यांनी शालेय मुलांनी चिट्टी काढल्यानंतर सोडत जाहीर केली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, गटविकास अधिकारी भागवत, सहाय्यक महसूल अधिकारी, अजय सावंत, मंगेश शिंगटे, मुकुंद डिंबले उपस्थित होते. अभिजीत बलकवडे, सतीश साळुंके, ज्ञानेश्वर पोळ यांनी प्रोजेक्टर व्दारे हे आरक्षण प्रदर्शित केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी हजर होते.
गावानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण (खुला)
माण, घोटवडे, अंबडवेट, नांदे, कासारसाई, बेलावडे, कोळावडे, मांदेडे, वेगरे,वळणे, साठेसाई, मुगावडे, मुगाव, तव, खांबोली, खुबवली, भांबर्डे, लव्हार्डे,चिंचवड, हाडशी, कोळावडे, शेडाणी, वातुंडे, मोसे, रावडे, पोमगाव, ताम्हिणी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पिंपळोली, दारवली, निवे, मुलखेड, टेमघर, नानेगाव,कासारआंबोली, बार्पे, वांजळे, दखणे, लवळे, भोडे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
भुगाव, आंबवणे, आंदगाव, असदे, अकोले, नांदगाव,जांबे, कोंढावळे, चिखलगाव, बोतरवाडी, आडमाळ, भुकूम.
सर्वसाधारण प्रवर्ग (स्त्री)
हिंजवडी, मारूंजी, नेरे, पौड, जामगाव, माले, मुळशी, कोळवण, भरे, उरवडे, खेचरे, आंदेशे, खारावडे, वारक, मारणेवाडी, कुळे, पाथरशेत, मुठा, भादस,चाले, भोयणी, भालगुडी, रिहे, वडगाव, कातरखडक, वांद्रे, वाळेण, जवळगाव.
अनुसुचित जाती (स्त्री)
चांदिवली, पिरंगुट, संभवे, शेरे, जातेडे
अनुसुचित जाती
डावजे, माळेगाव, कोंढूर, दासवे.
अनुसुचित जमाती (स्त्री)
चांदे, काशिग.
अनुसुचित जमाती
कुंभेरी. धामण ओहोळ.