सुशिक्षित अभियंता सुदर्शन जगदाळे यांना कर भरणाऱ्या नागरिकांचे भक्कम समर्थन

पाषाण : बाणेर बालेवाडी पाषाण सुस म्हाळुंगे व परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित, कर भरणाऱ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावणाऱ्या नागरिकांकडून श्री. सुदर्शन जगदाळे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

गेल्या 20–25 वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक आणि सुरक्षितता या मूलभूत बाबींची सोडवणूक न होता उलट राजकीय उपद्रव वाढतच चालले आहेत, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रात्री अपरात्री फटाक्यांचे आवाज, मोठ्या आवाजात DJ, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा, सिग्नलवर नागरिकांना त्रास देणारे कार्यकर्ते, मुलींच्या छेडछाडीच्या घटना — या सगळ्यांमुळे पोलिसिंग व सुरक्षिततेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो.
परिणामी सर्वसामान्य नागरिकांचे शांत व सुरक्षित जीवनच धोक्यात आले असून नागरिक भयभीत अवस्थेत जगत आहेत.
या पार्श्वभूमीवर, अभियंता, सॉफ्टवेअर व्यावसायिक आणि सोसायटी स्तरावर प्रत्यक्ष काम केलेले उमेदवार म्हणून श्री. सुदर्शन जगदाळे यांच्याकडे नागरिक सुशिक्षित, निर्भीड आणि जबाबदार नगरसेवक म्हणून पाहत आहेत.

नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,“आता घोषणाबाजी नको, व्यवस्थेला समजणारा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभा राहणारा प्रतिनिधी हवा.” याच अपेक्षेने नागरिक सुदर्शन जगदाळे यांना पसंती देत आहेत.

See also  'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर प्रतिकृती साकारणार ; सजावटीस  प्रारंभ