पुणे, बाणेर : “राया मोटर्स”, अधिकृत यामाहा डीलरशिप, बाणेर, पुणे येथे “Yamaha FZ-S FI Hybrid” बाईकचे भव्य लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे अरुण पोद्दार – सीईओ चॉइस इंटरनॅशनल यांच्या हस्ते या बाईकचे अनावरण करण्यात आले.
यावेळी माजी सचिव श्रीनिवास जाधव, आर्किटेक्ट सुमित बागडे, वकील भुजबळ, उद्योजक अर्जुन ननावरे, सागर बालवडकर, नितेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांचे राया मोटर्सचे प्रमोटर श्री. योगेश जाधव यांनी मन:पूर्वक स्वागत केले. ही नवी यामाहा FZ-S FI Hybrid बाईक खास आधुनिक हायब्रिड तंत्रज्ञानासह सुसज्ज असून, भारतातील पहिली अशा प्रकारची हायब्रिड बाईक आहे जी यामाहा कंपनीने ग्राहकांसाठी सादर केली आहे.
या बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे Stop & Start System. सिग्नल किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी काही सेकंद थांबल्यावर ती आपोआप बंद होते आणि तसेच रायडरने थोडा raise दिला, बाईक आपोआप सुरु होते. त्यामुळे आता रायडरला सिग्नलवर वारंवार बाईक बंद आणि सुरु करण्याची गरज नाही. या प्रणालीमुळे पेट्रोलची लक्षणीय बचत होते आणि मायलेज देखील अधिक मिळतो.
हायब्रिड टेक्नोलॉजीमुळे इंधन बचतीसोबतच पर्यावरणपूरक सवारीचा अनुभव ग्राहकांना मिळतो. मजबूत बॉडी, स्टायलिश डिझाईन, आणि प्रगत इंजिन तंत्रज्ञान यामुळे ही बाईक विशेषतः तरुण वर्गामध्ये लोकप्रिय ठरणार आहे.
ही बाईक केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर आरामदायी व स्मार्ट रायडिंगसाठी देखील एक उत्तम पर्याय आहे.
राया मोटर्स, बाणेर, पुणे येथे यामाहा कंपनीचे सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत – तेही कोणत्याही प्रतीक्षाशिवाय! विशेष म्हणजे, यामाहा R3 – जी कंपनीची सर्वोच्च बाईक आहे – ती देखील सध्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक श्री. योगेश जाधव, Raya Motors चे प्रमोटर, हे बाईक व ऑटोमोबाईल क्षेत्रात अत्यंत उत्साही व क्रिएटिव्ह व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांचे दुचाकीविषयीचे प्रेम आणि ग्राहकांसाठी सर्वोत्तम सेवा देण्याचा ध्यास यामध्येही ठळकपणे दिसून येतो.