डॉ. नमिता कोहक यांचे बाणेर येथे समर्थ व्याख्यानमाला व कपिला अखिला क्लब हाऊसच्या वतीने व्याख्यान संपन्न

बाणेर : समर्थ व्याख्यानमाला 6 वे सत्र आणि  कपिला अखिला क्लब हाऊस, बाणेर  यांच्यावतीने क्लब हाऊस कपिला अखिला
बाणेर इथे ” डॉ. नमिता कोहक ( नाशिक ) मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाइफ टाइम क्वीन 2017)यांचे ” सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले.


कोहक यांनी सांगितले की, ध्येय निश्चित असेल तर काही अशक्य नाही मी कॅन्सर सर्वायवर असून गेल्या दहा वर्षापासून त्यावरती काम करीत आहे. मनुष्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले जीवन आनंदी जगले पाहिजे. मी स्वतः कॅन्सरवर मात करून जवळपास  1800 कॅन्सर ग्रस्त मुलांची काळजी घेत आहे.

डॉक्टर नमिता कोहक या नाशिक मधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्या प्रेरणादायी असून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले आहे एक यशस्वी उद्योजीका आहेत.
 त्यांच्या नावावर  72 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय  पुरस्कारांची नोंद आहे.डॉक्टर नमिता कोहक या आयुष्य पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपल्या विचारांनी सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केले आलेल्या संकटावर मात करण्याची जिद्द हवी.असे सांगितले. यावेळी दोन्ही क्लबचे 250 जेष्ठ नागरिक व्याख्यानास उपस्थित होते.


   पाहुण्यांचा सत्कार मंगल  घोडे ( अतिरिक्त कलेक्टर सेवानिवृत्त ) यांचे हस्ते करणेत आला. आभार अजय कदम ( ACP, पुणे, सेवानिवृत्त )यांनी मानले. कार्यक्रमास कपिल अखिला सोसायटीचे चेअरमन दिनेश कोथा वदे, रवींद्र मराठे दिलीप बोरकर आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

See also  सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी - ना. चंद्रकांतदादा पाटील