राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शरद पवार यांनी स्वीकारली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी खासदार शरदचंद्रजी पवार यांनी पुन्हा स्वीकारल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 16 जणांच्या कोर टीमने खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा फेटाळला होता. देशातील विविध पक्षाच्या नेतृत्वांचा, पक्षाच्या घटनेचा व सदस्यांचा आग्रह आदर राखत शरद पवार यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, एवढी तीव्र प्रतिक्रिया येईल असे वाटले नव्हते तीव्र प्रतिक्रिया मुळेच निर्णय मागे घेतला. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होतील यामध्ये तथ्य नाही. कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करू शकत नाही. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी कोणतीही जबाबदारी मी घेणार नाही. पक्षांमध्ये उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे.

यावेळी पक्ष संघटनेमध्ये नवीन पदे व नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्व नेत्यांची माफी मागतो.

कुणाला पक्ष सोडून जायचे असेल तर त्यांना आपण थांबू शकत नाही असा अप्रत्यक्ष तुलाही पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्या नेते व कार्यकर्त्यांना लगावला. या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार यांना राजीनामा बाबत पुसटशी कल्पना होती.

शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

See also  वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना