पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे व जगत्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रम मध्ये अॅड पांडुरंग थोरवे, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, माजी अध्यक्ष पुणे वकील संघ. यांना वारकरी सेवा सन्मान पुरस्कार २०२५ हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे नवनिर्वाचित अध्यक्ष ह.भ.प.जालिंदर महाराज मोरे, यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
ॲड. पांडुरंग थोरवे हे वारकरी कुटुंबातील असून त्यांचा जन्म बालेवाडी येथील काकड आरती सुरुवात होते वेळी झाला असल्याने त्यांचे नाव पांडुरंग ठेवण्यात आला. तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर, भगिनी चंद्रभागा व इंद्रायणी असे ठेवण्यात आले आहे. थोरवे कुटुंबीयांनी विविध मंदिरांना देणगी, विविध पंगतींचे आयोजन करत असतात तसेच त्यांचा कुटुंबीयांना जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर देहू येथे तुकाराम बीज सप्ताह मध्ये होळीच्या दिवशी दर वर्षी पूजा केली जाते व पंगत दिली जाते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे दर वर्षी कार्तिक वद्य-तृतीयाला महीम्न पूजा केली जाते. तसेच २०२२-२३ मध्ये पुणे बार असोसिएशन अध्यक्ष असताना जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज देहू यांच्या पलिखी सोहळा वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती. कै. ह.भ.प ज्योतिभाऊ विश्वनाथ थोरवे यांनी अनेक कीर्तनकार प्रवचनकार वादक गायक यांना सुवर्ण दान केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या मागील दिंडी क्र. ७० जगतगुरु विचार मंच सचिव म्हणून व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी येथील विश्वस्त म्हणून कार्यरत आहे.
सदर पुरस्कार सोहळा कार्यक्रमात ह.भ.प.जालिंदर महाराज मोरे नवनिर्वाचित अध्यक्ष – जगतगुरु तुकाराम महाराज संस्थान,
ह.भ.प दिलीप महाराज मोरे (विश्वस्त), ह.भ.प.विक्रम महाराज मोरे (विश्वस्त), ह.भ.प. उमेश महाराज मोरे (विश्वस्त)
ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे (विश्वस्त) यांचा नवनिर्वाचित विश्वस्त म्हणून सत्कार करण्यात आला, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे राजाभाऊ चोपदार, गाथा निरुपणकार ह. भ. प सचिन महाराज पवार, ह.भ.प विलास बालवडकर (जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र वारकरी सेवा संघ पुणे), ह.भ.प. विजू अण्णा जगताप, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख, बाणेर येथील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वारकरी सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर, यांनी केले होते सूत्रसंचालन मयुरी पिसाळ यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सौरभ शिंदे यांनी केले