“प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी” चा ९१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

पुणे : “प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी” चा ९१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत संस्थेला शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ची स्थापना  दिवंगत गुरूवर्य श्री  शंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या ५ शिक्षक सहकाऱ्यांनी १९३४ मध्ये “अक्षय तृतीया” या दिवशी केली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीतील  प्रमुख शब्द “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न”. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आधुनिक उपकरणे व आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचा संकल्प त्या दिनी करण्यात आला जो अजूनही पाळला जातो.  १९३४ साली लावलेल्या या  रोपट्याचा आता ९१ वर्षा नंतर एक मोठा वटवृक्ष तयार झालेलं आहे. 


संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन र एकबोटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. सर्व स्तरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. 
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सर्व संबंधीत तसेच सर्व विद्यालय महाविद्यायाचे प्राचार्य तसेच शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष , कार्याध्यक्ष , कार्यवाह , सहकार्यवाह उपस्थित होते .

पी. ई. सोसायटीचे आध्यक्ष श्री विघ्नहारी देवमहाराज,  संस्थेचे उपाध्यक्ष   डॉ. अरविंद पांडे , संस्थेचे कार्याध्यक्ष,  डॉ. गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, उपकार्यवाह डॉ. प्रकाश दीक्षित, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह दीपक मराठे, नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरली आण्णा मोहोळ, आमदार अमित गोरखे, राज्यसभा  खासदार मेघाताई कुलकर्णी,
आमदार श्री हेमंत रासने, मा  माधुरीताई सहस्त्रबुध्दे, आमदार जगदीश मुळिक, डाॅ प्रकाश करमळकर, कुलगुरू, आर्यव्रत ईंटरनॅशनल विद्यापीठ, त्रिपुरा, नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रा. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ:  प्र. कुलगुरू डाॅ. पराग काळकर,  रजिस्टार डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा विभाग प्रमुख  डाॅ. प्रभाकर  देसाई, विद्यापीठ अनुदान अयोगाचे माजी उपाध्यक्ष डाॅ. भूषण पटवर्धन, वृत्तपत्र विभाग प्रमुख श्री संजय तांबट, डाॅ. प्रफुल्ल पवार, डाॅ प्रसन्नजित फडणविस, श्री रवींद्र रंजनवाडकर, मा भाऊसाहेब जाधव, राजेश नायर,जगदीश कुलकर्णी, डाॅ. सुदाम शेळके, डाॅ. उमेद बिबवे, सौ पारखी, डाॅ. श्रीकांत पाटील, श्री माधव भंडारी, डाॅ. दत्तात्रय जाधव  डॉ. राजेंद्र भामरे , मा  विजय पुरंदरे डाॅ. सतिश डुंबरे, रवींद्र शिंगणापुरकर,  मा सुनिल महाजन, रौनक जयाशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या शामला देसाई, सिमबायसिसचे प्राचार्य डाॅ. सोमण, डाॅ. धनंजय लोखंडे, डॉ. अडसूळ, डॉ. अशोक कांबळे, डॉ. अबाळे, बापू मानकर, वेदमूर्ती नाना मुळे, डाॅ गोलार, डायरेक्टर, ईनोव्हेश अॅड ईनव्हेंशन सेंटर,  आमदार जगदीश मुळीक. प्रा दिपक माने, मा शिरीष कुलकर्णी, मा सुधीर आव्हाड, मा रवींद्र साळेगावकर, मा प्रमोद वलगडेकर, बापू मानकर, मा सुनिल पांडे व श्री एस के जैन हे उपस्थित होते. या शिवाय विविध वृत्तपत्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

See also  भाजपाची मुघलशाही सहन करणार नाही, छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा