मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यवसायिकाला  5 कोटी 48 लाख 64 हजार  दंड – रयतच्या मागणीला यश

पुणे :  बाणेर  येथील सर्वे नं 33/1/9 येथिल  M – AGILE मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने  विनापरवाना रस्ते खोदाई  केली म्हणून पुणे महानगरपालिकेकडून 5 कोटी 48 लाख 64 हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे.रयत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला यश आले आहे.तो दंड लवकरात लवकर वसूल करण्यात यावा. अन्यथा या बांधकाम व्यावसायिकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ केली जात असेल तर  संपूर्ण पुणे शहरात मालपाणी इस्टेट यांच्या चालू असणाऱ्या बांधकामास Work Stop Notice द्या अशी मागणी लवकरच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचेकडे पत्राद्वारे करणार असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले.

  त्या बांधकाम व्यावसायिकास पाठीशी घालण्याचे काम कोणी करत असेल तर त्यांचेवर देखिल कारवाई करण्याची मागणी आम्ही आयुक्तांकडे करू.या बांधकाम  व्यावसायिकाची कृती मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी होती . या बांधकाम व्यावसायिकाने पुणे शहरात चालू असणाऱ्या सर्व बांधकामांची चौकशी करून शहानिशा करावी कि विनापरवाना विद्युत  केबल टाकली आहे का?  याची चौकशी करावी असे रयत स्वाभिमानी संघटनेचे  रविराज काळे यांनी सांगितले.

See also  वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महसूल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश, पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक