माजी नगरसेवक तुषार कामठे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पिंपरी : माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्या संदर्भामध्ये दिलेल्या आदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आम्ही स्वागत करतो.
काही वर्ष निवडणुका लांबल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नव्हती. प्रशासक नियुक्तीमुळे जनतेच्या कामांसाठी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना पाठपुरावा करताना जाणवत होता. अखेर कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची असते तसेच कार्यकर्त्यांसाठी देखील निवडणुका महत्त्वाच्या असल्याने प्रतीक्षेत असलेल्या पालिकेच्या निवडणुका होणार असल्याचा निश्चित आनंद आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची निवडणुका लढण्याची तयारी झालेली आहे. महाविकास आघाडी मधून अथवा पक्ष आदेशाप्रमाणे स्वतंत्र निवडणुका लढून पालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत.
घर ताज्या बातम्या तुषार कामठे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची सर्वोच्च...