महाळुंगे बालेवाडी क्रीडानगरी मध्ये पुणे शहरातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार – अमोल बालवडकर

बालेवाडी : महाराष्ट्र क्रीडा व युवक संचालनालय व अमोल बालवडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मुख्य स्टेडियमवर पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.

योग दिनानिमित्त क्रिडा व युवक संचलनालय व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सभासद यांच्या समवेत कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली. दरवर्षी हजारो नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होतात.
यावेळी माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, क्रिडा उपसंचालक सुहास पाटील, सुंदर बालवडकर, आप्पा भुमकर, रोनक गोटे, सुमित कांबळे व अमोल बालवडकर फाऊॅडेशनचे सभासद उपस्थित होते.

दरवर्षी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही तज्ञ प्रशिक्षकांच्या उपस्थितीमध्ये योग दिन साजरा करण्यात येणार असून नागरिकांना योगासने करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरातील नागरिकांसह पुण्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले आहे.

See also  राज्यात ज्यूदो खेळाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस