अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी मार्च 2025 चा निकाल 100 टक्के

बाणेर : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला आहे.
यावर्षी या परीक्षेसाठी 62 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात
प्रथम क्रमांक :-  आर्यन दत्तात्रय जाधव- 91.20%
द्वितीय क्रमांक : प्रणवी चंद्रभान घुले-88.60%
तृतीय क्रमांक: कार्तिक संदीप मगर-87.80% या विद्यार्थ्यांनी पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक मुरकुटे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

See also  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांकडून सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा