विद्यान्चल हायस्कूलने एसएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

औंध : २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीच्या एसएससी परीक्षेचे निकाल १३ मे रोजी जाहीर झाले आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यान्चल हायस्कूलने सलग १७ व्या वर्षी १००% यश मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली.

या परीक्षेला बसलेल्या एकूण ५८ विद्यार्थ्यांपैकी सर्वांनी यश मिळवले. त्यापैकी ५२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले असून ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले.

शाळेची टॉपर कु. मुग्धा निंबाळकर हिने ९५.४०% गुण मिळवले, त्याचबरोबर कु. अवनी जगताप हिने ९२.४०% आणि मा. राजवर्धन निंबाळकर याने ९२.२०% गुण मिळवले.

या उत्तम कामगिरीमुळे शाळेची शैक्षणिक उत्कृष्टतेची ओळख अधिक बळकट झाली आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिक संसाधने व मार्गदर्शन देऊन शाळा त्यांना पुढील वाटचालीसाठी सतत पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे.

See also  अंदमानच्या कृषी संशोधन केंद्रास महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांची भेट