सुसगाव परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

सुस : पुणे म न पा हृध्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस – महाळुंगे या गावात खुप मोठया प्रमाणात कचरा व्यवस्थापनाची अडचण निर्माण झालेली असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

सुसगाव येथील पारखे वस्ती – काळुबाई मंदिर कडील भाग – महादेव नगर – भगवती नगर – ठकसेननगर- निकाळजे वस्ती – तापकिर वस्ती या विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. आवश्यक तिथे कचरा पेटीची व्यवस्था नसल्याने नागरिक त्यांच्या सोयीनुसार येताना जाताना कचरा फेकत असतात. त्यामुळे खुप मोठया प्रमाणात कचत्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुर्गधी मोठया प्रमाणात येत असुन तिथे भटकी कुत्री मोठया प्रमाणात जमतात व जाणात्या येणात्या लोकांच्या अंगावर धावुन जातात तर
काही लोक आजुबाजुच्या मोकळ्या परिसरातील शेतात कचरा फेकतात त्यामुळे शेती करण्यासही अडचण निर्माण होत आहे . आता लगेचच जुन महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने पुन्हा मच्छर डास व साथीचे रोग पसरू नये म्हणुन आपण आरोग्याच्या दृष्टीने ताबडतोब काळजी घ्यावी.नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ताबडतोब कचरा व्यवस्थापन व नियोजन करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथरूड विधानसभा उपशहर संघटिका ज्योती नितीन चांदेरे यांनी केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ताबडतोब कचरा व्यवस्थापन व नियोजन करण्यात यावे तसेच सुसगाव परिसरामध्ये कचरा उचलणाऱ्या संस्थांची नेमणूक करून सोसायटी मधला कचरा उचलला जावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथरूड विधानसभा उपशहर संघटिका ज्योती नितीन चांदेरे यांनी केली आहे.

See also  नियोजन विभागाकडून सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा ३८१ कोटींचा शासन निर्णय जारी