पुणे : सुस महाळुंगे बावधन पाषाण सुतारवाडी बाणेर परिसरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात भोर वेल्हा मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत विकास कामांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. यावेळी पाषाण परिसरातील समस्यांच्या संदर्भामध्ये माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी तर बावधन परिसरातील विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये सूर्यकांत भुंडे यांनी निवेदन दिले.
यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, सूर्यकांत भुंडे, अभिजीत दगडे, दिपक दगडे, युवराज कोळेकर, विनायक काकडे ,सुजित भुंडे ,आशिष दगडे ,अशोक दगडे,जनार्दन दगडे ,सुरज भुंडे आदी उपस्थित होते.
सुसगाव परिसरातील मुख्य रस्ता रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांसाठी निधी, म्हाळुंगे परिसरातील रस्ते, आरोग्य, ड्रेनेज, पाणी पुरवठा याबाबत आमदार शंकर मांडेकर यांनी आयुक्तांना सुचना केल्या. पाषाण येथील सुस रोड येथील ब्रिजवरून महामार्गावर उतरण्यासाठी रस्ता करण्याची मागणी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी केली.
यावेळी आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येत असून हे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. समाविष्ट नावांसाठी रस्ते पाणी वीज यासाठी प्राधान्याने निधी दिला जात असल्याचे यावेळी सांगितले.