कोथरूड मतदार संघातील सुस रोडचा कचरा प्रकल्प हलवणे जे चंद्रकांत दादांना जमले नाही ते अजित दादा करतील का?

बाणेर : बाणेर येथील सर्वे नंबर 48 मध्ये उभारण्यात आलेला कचरा प्लांट हलवण्यात यावा यासाठी या परिसरातील नागरिकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे प्लांट सुरू नसताना कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. काही आठवड्यांपूर्वी कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्लांट बंद करण्यात यावा अन्यथा हा प्लांटच्या दारात मी खुर्ची टाकून बसेल असा दम आयुक्तांना भरला होता. परंतु यानंतर देखील या परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी कोणतीही बाब पुणे महानगरपालिकेकडून झाली नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांचा आमदार चंद्रकांत दादा पाटील हे काम करू शकतील का? असा आश्वास राहिला नाही.

बाणेर सुस रोड येथील कचरा प्लांट कारवाई करून बंद करणे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आपल्या मतदारसंघांमध्ये जमले नाही. हे काम करण्यासाठी या परिसरातील नागरिकांच्या संघटनेने हजारो नागरिकांच्या सह्या गोळा करत पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे एका बाणेर मधील कार्यक्रमांमध्ये सुसरोड बाणेर विकास मंचच्या वतीने निवेदन देत धाव घेतली. यावेळी आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत कचरा प्लांट हलवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाणेर मधील माजी नगरसेवक यांच्या कालावधीमध्ये हा कचरा प्रकल्प येथे उभारण्यात आला होता.  आता हा कचरा प्लांट हलणार का? की पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे देण्यात आलेले निवेदन देखील फक्त प्रक्रियेचा एक भाग ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यामुळे हा कचरा प्रकल्प ते नक्कीच स्थलांतरित करतील असा आम्हाला विश्वास आहे असे सुसरोड बाणेर विकास मंचाच्या वतीने सांगण्यात आले.

See also  कोथरुडकरांठी मोफत महा ईसेवा केंद्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम