पुणे : पुणे शहराच्या विकासामध्ये सिंहांचा वाटा असणारे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री स्वर्गीय सुरेश भाई कलमाडी यांचे आज पहाटे निधन झाले.
पुणे शहरावर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी बराच काळ आपले वर्चस्व निर्माण केले होते. ” सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ” पुणे शहराचे विकासाचे शिल्पकार, काँग्रेस पक्षात अनेक कार्यकर्त्यांना ताकद देणार नेतृत्व, पुणे महानगरपालिकेत अनेक विविध समाजातील कार्यकर्त्यांस नगरसेवक व विविध पदे देवून समाजात नावलौकिक देणार आदर्श नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
पुणे शहरामध्ये शिवछत्रपती क्रीडा नगरी महाळुंगे बालेवाडी तयार करण्यासाठी तसेच 2008 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांची हानी झाली आहे.
























