कोथरूड : कोथरूड येथील डॉ. आंबेडकर विद्यालया मधील वृक्षतोडी संदर्भामध्ये कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य जयदीप पडवळ यांनी केली आहे.
विशेष बाब म्हणजे या वृक्षतोडीसाठी संस्थेला देण्यात आलेल्या 26/12/22रोजीच्य जुन्या फांद्या छाटणीच्या परवानगी पत्राचा वापर करत ही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या परिसरातील 8 मोठे वृक्ष तोडण्यात आले.
या वृक्षतोडीची घटना महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून याबाबत पंचनामे करण्यात आले आहेत. पावसाळ्यामध्ये अनेक शिक्षण संस्था पर्यावरण पूरक वृक्ष लागवड करत असताना अशा पद्धतीने होत असलेली वृक्षतोड ही निषेधार्य आहे असे मत यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले.
या प्रकरणी योग्य कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे वृक्षतोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मदत होईल अशी मागणी जयदीप पडवळ यांनी केली आहे.