बाणेर : योगीराज नागरी सहकारी पतसंस्था, बाणेर शाखा २९ वा वर्धापन दिनानिमित्त पतसंस्थेमध्ये सोमवार 26 मे 2025 रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर तापकीर – संस्थापक अध्यक्ष, मा. नगरसेवक, पुणे मनपा, श्री. राजेश शं. विधाते – उपाध्यक्ष, श्री. राजेंद्र मुरकुटे – शाखाध्यक्ष, श्री. शंकरराव सायकर – शाखाध्यक्ष व संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचा सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आर्थिक क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत समाजातील विविध क्षेत्रातील गरजवंत नागरिकांना देखील आर्थिक मदत केली आहे. याचबरोबर शैक्षणिक मदत, गरीब मुलींचे विवाह, आरोग्य विषयक सहाय्य तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यात पतसंस्थेने मदत करत सहभाग घेतला आहे. पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले आहे.
घर ताज्या बातम्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा 29 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी चहापान कार्यक्रमाचे आयोजन