पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. विलासराव देशमुख यांची जयंती साजरी

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रिय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार  व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  संजय बालगुडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.


यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्राची दुधाने, ज्योती परदेशी, सेवादलाचे प्रकाश पवार, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, दिलीप लोळगे, विठ्ठल गायकवाड, पोपट पाटोळे आदी उपस्थित होते.

See also  ज्येष्ठ नागरिक महासंघाची गायन स्पर्धा संपन्न शरद चोंच यांनी पटकावला प्रथम क्रमांक