मुळशी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पुणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न

पौड : मुळशी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पुणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन, पौड, मुळशी येथे संपन्न झाली.

येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पक्षाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मुळशी तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे मुळशी तालुक्यात काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात मुसंडी मारेल असं विश्वास जिल्हाध्यक्ष संजय जगताप सर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

See also  कशिश सोशल फाउंडेशनच्या फॅशन शो मधून भारतीय सैन्याला अनोखी मानवंदना