बँक मित्रांवर (बँक एजन्ट ) होतं असलेल्या अन्यायाविरुद्ध दिनांक 1 मे रोजी मागणी दिन आंदोलन करण्यात आले.

पुणे : महाराष्ट्रातील विविध बँकामध्ये बँकेच्या प्रगतीसाठी काम करत असलेल्या 20 हजाराहून अधिक बँक मित्रांवर (बँक एजेंट ) होतं असलेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेतर्फे गुरुवार दि 1 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यात कलेक्टर कचेरी जवळ स्टेट बँकेजवळ मागणी दिन आंदोलन करण्यात आले.


बँक मित्रांच्या कमिशनच्या रक्कमेत वाढ करावी. बँकेच्या रक्कम व पैशांची वाहतूक करणाऱ्या बँक मित्रांच्या सुरक्षित्तेची हमी म्हणून त्यांचा विमा काढावा. रजा, मेडिकल सुविधा, सुट्ट्या, देण्यात याव्यात. बँक व्यवस्थापनाने बँक प्रशासनाबरोबर मध्यस्थी करून काम करणाऱ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट सेवा बंद करण्यात यावी. त्याऐवजी थेट बँक मित्रांबरोबर बँकेचे कामकाज व सेवा करण्याविषयीं कॉन्ट्रॅक्ट करण्यात यावे. आदी मागण्यासाठी हे मागणी दिन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, पुणे, पंजाब नॅशनल बँक एम्प्लॉईज युनियन, पुणे व पुणे ज़िल्हा बँक एम्प्लॉईज असोसिएशन, पुणे या आंदोलनात सहभागी झाले होते.

कॉम्रेड दिपक पाटील,  सारिका सचिन लोणंदकर, दिगंबर सदानंदे, सोनल युवराज चोपडे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले, व शिरीष राणे, शैलेश टिळेकर,मीननाथ नेरळ, नाना ठोंबरे,महेश पारखी प्रफुल्ल केंगळे यांनी पाठिंबे जाहीर केला.

See also  कोथरूड मध्ये बोलबाला, महाविकास आघाडीचे तिकीट कोणाला?