पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी स्वराज्य पक्षाने दिले झोपुन निवेदन

पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वराज्य पक्षाने दिले झोपुन निवेदन देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग पुणे च्या गलथान कारभारामुळे मुळशी मधील 16 गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी झोपून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ब्रिटिशकालीन कोळवण ते काशिग पूल धोकादायक झाला आहे तो नव्याने बांधावा असे स्वराज्य पक्ष २ वर्षापासून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे. रस्त्याची निविदा ५ मार्च २०२४ ला निघून त्याची मुदत १ वर्षाची होती. कामाची रक्कम ४ कोटी ८६ लाख मुदत संपून काम पूर्ण झाले नाही. प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी १५ मे च्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन स्वराज्य पक्षाचे राजु फाले यांना दिले होते. यामुळे स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करत निवेदन देण्यात आले

जर ८ दिवसात काम जोरात सुरु नाही झाले तर अधिकाऱ्यांना काळे फासणार असे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव  यांनी सांगितले.

कोळवण ते काशीग पूल महत्त्वपूर्ण असून पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यामध्ये नागरिकांचा संपर्क तुटतो. या बाबींचा विचार करून पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे 70 वा सहकार सप्ताह साजरा