रोटरीचा “व्होकेशनल अँड सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड” प्राचार्य संजय खरात यांना प्रदान

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महविद्यालयात “रोटरी क्लब आँफ पुणे,लोकमान्यनगर यांच्या वतीने दिले जाणारे “व्होकेशनल अँड सर्व्हिस एक्सलन्स अवाॅर्ड. २०२२-२३” दिले गेले. या पुरस्कार प्रदानासाठी पद्मश्री प्रतापराव पवार उपस्थित होते.
या प्रसंगी श्री विष्णू मनोहर,आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुक, श्री निलेश निमकर, फाउंडर आॅफ ‘क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट”, श्री सचिन व्यवहारे, व्यवस्थापक, दीनानाथ मंगेशकर हाँस्पिटल यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी उच्च शिक्षण व संशोधनामधील विशेष कामगिरीसाठी माॅडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी ते म्हणाले,” हा पुरस्कार माझा नसून पी ई सोसायटी व माझे सहकारी प्रध्यापक यांचा आहे. कार्याध्यक्ष डाॅ गजानन एकबोटे यांचे सतत मार्गदर्शन असते. गोड्या पाण्यातील माशांचे संशोधन ही माझी आवड आहे. या पुरस्कारामुळे मला अजून संशोधन कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.”
या प्रसंगी श्री दिपक शिकारपुर, संचालक, ‘कायनेटिक कम्युनिकेशन’ विषेश उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित म्हणाले,” स्किल डेव्हलपमेंट उच्च शिक्षणामधे समाविष्ठ होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय उच्च शिक्षणाचा निभाव लागणार नाही.”
या प्रसंगी बोलताना पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले” सगळ्या पुरस्कार प्राप्त मान्यवारांचे काम समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम असे कार्यक्रम करतात.” पुढे ते म्हणाले,” सगळ्यांनी आपल्या तब्येतीला अग्रक्रम दिला पाहिजे. तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. शिक्षणामध्ये नविन नविन पध्दती अवलंबून विद्यार्थ्यांचा विकास केला पाहिजे. शिक्षकाने त्यांना पालकांसारखे समजून घेणे गरजेचे आहे.”
डाॅ मधुरा विप्र, सेक्रेटरी, रोटरी क्लब,लोकमान्य नगर यांनी माॅडर्न महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले. का्र्यक्रमाचे सूत्र संचलन मा वासवी मुळे यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डाॅ ज्योती गगनग्रास, डाॅ शुभांगी भातांब्रेकर व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी
प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह पी ई सोसायटी हे विशेष उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन