राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्यागाने  सामाजिक सुधारणेची पाया भरणी-  श्रीरंग चव्हाण पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : अस्पृश्यता , जातीयेत समाज खितपत पडला होता अशा कठीण प्रसंगी अतिशय दुरदृष्टीने   पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्यागाने देशात सामाजिक सुधारणांची पायाभरणी झाली.


त्या लोकहितवादी  राज्यकर्त्या म्हणून त्यांचे कार्य  आजही प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केले आहे.
.पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर  यांच्या जयंती निमित्त धायरी येथे खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या वतीने  आज अभिवादन करण्यात आले . चव्हाण पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर  यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थित बारामती लोकसभा मतदार संघ अध्यक्ष लहू अण्णा निवगुणे वृक्ष प्राधिकरण समितीचे मा सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर काँग्रेस पर्यावरण विभग उपाध्यक्ष धनंजय पाटील, बारामती लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सुरेश मते, खडकवासला काँगेस उपाध्यक्ष संजय अभंग, हवेली तालुका अध्यक्ष शंकरराव दांगट, विश्वजित जाधव,गुलाब पोकळे, रघुनाथ यादव,राजाभाऊ कुंभार ,साहेबराव मते, नामदेवराव भुरूक,आदी  उपस्थित होते.

See also  कर्वेनगर येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल मध्ये अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत